दिंडोरी - दिंडोरी शहरालगत असलेल्या गुरुसाई हॉटेल लगतच्या पटांगणात बेवारस मृतदेह आढळला आहे, सविस्तर वृत्त असे की दिंडोरी वणी रस्त्यावरील हॉटेल गुरुसाई शेजारीच मोकळ्या जागेत मृतदेह असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, यावेळी मृतदेह हा अनोळखी पुरुष जातीचा असून अंदाजी वय 40 ते 45 वर्ष असून अंगात लाल रंगाचे हाफ स्वेटर, राखाडी रंगाचा टी शर्ट, व नाईट पॅन्ट घातलेली आहे, अधिक माहिती आढळल्यास हवालदार कमलेश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन दिंडोरी पोलिसांनी केले आहे,