वणी/ नांदुरी । प्रतिनिधी
सप्तशृंग गडावर नवसपुर्तीसाठी जाणार्या भाविकांची पिकअप दरेगाव फाट्यानजीक उलटल्याने 26 भाविक जखमी झाले असून जखमी भाविकांना अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास पाथर्डी नाशिक येथून नवसपूर्तीसाठी सप्तशृंग गडावर जाणरी पिकअप क्रमांक (एम.एच.15/ जि.व्ही.4538) ही दरेगाव ता. कळवण फाट्यानजीक वळणावर चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एकुण लहान मुलांसह 26 भाविक जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेद्वारे जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी आणण्यात आले. जखमींवर उपचार करण्यासाठी शहरातील खाजगी डॉक्टरांना देखील पाचारण करण्यात आले होते. वणी ग्रामीण रुग्णालयात डॉ. विराम ठाकरे, डॉ. अनिल पवार, डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. योगेश पाटील, वणी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. किशोर मोरे यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बेगाळ यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमींची पाहणी केली. हे सर्व भाविक नाशिक वाशीक व जालना जिल्ह्यातील असून यातील 5 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाणे व नांदुरी आऊट पोस्टचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मदत करण्यासाठी परिसरातील नागरीकांनी धाव घेतली. अपघात स्थळापासून ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी डॉ. मानटे, डॉ. दिघोळे, डॉ. राठोड, डॉ. भोपळे यांच्यासह रुग्णवाहीका चालक राजेश परदेशी, प्रशांत चव्हाण, प्रशांत पाटील यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले.
जखमींना नाशिक रुग्णालयात दाखल:-
आशाबाई केशव खडसे (35), रोशनी गणेश बांगरे (19), प्रियांश अनिल जाधव (4 ), खुशी अनिल बोरकर (5 ), तनु निंबाजी खंदारे (5), अनिल नामदेव बोरकर (30), आयोध्या अनिल जाधव (20), विलास पुंडलिक पारवे (45), नंदा विलास पारवे (40), ओम रामकृष्ण गायकवाड (16), गणेश अंबादास बोरकर (7), हर्षदा अंबादास बोरकर (2), शारदा अंबादास बोरकर (25), अंबादास ज्ञानोबा बोरकर (30), रंजना एकनाथ हिवराळे (48), सखाराम सुदामराव पारवे (33), राधा सखाराम पारवे (25), मनकर्णाबाई शिवाजी खंदारे (60), मनीषा अनिल बोरकर (20) , गणेश श्रीकांत बांगरे (23), छाया भगवान तांबे (35), एकनाथ भगवान हिवराळे (65), शिवाजी तुकाराम खंदारे (60 ), अर्चना विलास पालवे (18) , शोभा निंबाजी खंदारे (25).