maharashtratribalnews

पत्रकार मनोज पाटील, गणेश भाऊ हिरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित कादवा कारखान्याचे निमंत्रित अंबादास पाटील यांचा सत्कार

दिंडोरी@कृष्णा पवार तालुका प्रतिनिधी- 

दिंडोरी-दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावचे पोलीस पाटील मा. श्री. अंबादास शंकरराव पाटील यांची कादवा सहकारी साखर कारखाना निमंत्रित संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे 
दिंडोरी तालुका शेतकरी संघाच्या वतीने संचालक गणेशभाऊ हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे कादवा सहकारी साखर कारखाना स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच निळवंडी गावाला निमंत्रित संचालक पद मिळाले असल्याचे प्रतिपादन गणेश हिरे व मनोज पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने