maharashtratribalnews

त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयाच्या बाहेर दरफलक लावण्याची मागणी.

देवडोंगरी l शंकर निंबारे 
       दि.२९ त्र्यंबकेशर तालुक्यातील खाजगी रुग्णालयाच्या/ दवाखान्याच्या दर्शनी भागात रुग्णसेवांचे दरफलक नसल्याने नागरिकांची (रुग्णांची) मोठ्या प्रमाणात लुट होतं असल्याचे निदर्शनास आल्याने, खाजगी रुग्णालये / दवाखान्याच्या बाहेर दर्शनी भागात रुग्णसेवांचे दरफलक बंधनकारक करण्यात यावे अशी भाजपा नाशिक जिल्हा चिटणीस जयवंत हागोटे आणि भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष उत्तम लिलके यांनी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांच्याकडे मागणी केली आहे.
    त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये बहुतांश खाजगी रुग्णालये व दवाखाने आहेत त्र्यंबकेश्वर तालुका हा आदिवासी राखीव असून या तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक दुर्बल, गरीब मागासलेले कुटुंब आहेत या कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी झाला की तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात घेऊन येतात आणि खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार करतात. दवाखान्याचे डॉक्टर रुग्णांचे बिल आवाच्या, सव्वा लावतात त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात लूट चाललेली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची लूट थांबली पाहिजे त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये बहुतांश खाजगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये बाहेर दर्शनी भागात रुग्णसेवांचे दरफलक न लावल्याने रुग्णांची लूट होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व खाजगी रुग्णालये व दवाखाने यांना दरफलक बंधनकारक करण्यात यावे. रुग्णालये आणि दवाखान्यात बाहेरील दर्शनी भागामध्ये तपासणी शुल्क याच बरोबरीने शस्त्रक्रिया गृहासह या शस्त्रक्रिया शुल्क, नोंदणी शुल्क, तपासणी शुल्क, सल्ला देण्याची शुल्क, समुपदेशन परिचारिका शुल्क व इतर शुल्क याबाबत मराठी भाषेतून ठळक दिसेल अशा ठिकाणी लावावे. अशी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांकडून मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने