दिंडोरी l प्रतिनिधी: सह्याद्री देवराई महाराष्ट्र व भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले दोन दिवसीय बीज संमेलन-२०२५ भारती विद्यापीठाच्या पुणे येथील धनकवडी शैक्षणिक संकुलात अतिशय उत्साहात पार पडले.यावेळी देशी वाणांसाठी आपल्या आयुष्य वेचणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा संमेलनाच्या समारोपात जीवन गौरव पुरस्कार व सन्मानपत्र ज्येष्ठ गायक श्री आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सदर बीज संमेलनामध्ये मध्ये महाराष्ट्रातील सर्व देवराईंची सदस्य तसेच इतरही पर्यावरणावरती काम करणाऱ्या संस्था ,व्यक्ती यांची उपस्थिती होती.विशेष बाब म्हणजे *सह्याद्री देवराई गोपालकृष्ण मोहाडी नाशिक संस्थेच्या विशेष व नाविन्यपूर्ण संकल्पनांचा महाराष्ट्रातील इतर देवरायांनाही फायदा व्हावा म्हणून सखोल माहिती देवराई सदस्यांनी दिली*.
सदर बीज संमेलनामध्ये विविध झाडांच्या बियांचे प्रदर्शन मांडण्यात आलेले होते त्यासोबत फलक व इतंभूत माहिती ठेवण्यात आलेली होती, तसेच झाडांच्या पानांचे प्रदर्शन विविध अति दुर्मिळ झाडांचे प्रदर्शन विविध झाडां विषयक पुस्तकांचे प्रदर्शन तसेच देशी कडधान्यांचे प्रदर्शन माहितीसह विविध स्टॉल लावण्यात आले होते .त्यामध्ये पानवटे ,चिमणी घर व पक्षांच्या घरट्यांची माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते.पर्यावरण तज्ञ यांचे मार्गदर्शक चर्चासत्र ही संपन्न झाले.ज्यामध्ये विविध झाडांची माहिती त्याचे फायदे व झाडांविषयी असलेल्या शंकांचे निरसन प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सोडवण्यात आले.
मोहाडी देवराईचा विशेष सन्मान प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे , सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
अतिशय भव्य दिव्य बीज संमेलनामध्ये विद्यार्थ्यांची झाडावरील गाणे ,झाडांची प्रार्थना व झाडांचे नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले.सदर बीज संमेलनात भारती विद्यापीठाचे संचालक आमदार श्री सत्यजित कदम तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक श्री गणेश आचार्य ,पद्मश्री राहीबाई पोपेरे हे उपस्थित होते.
पुणे : सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना सह्याद्री देवराई गोपालकृष्ण मोहाडी सदस्य.