maharashtratribalnews

सुरगाणा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध

सुरगाणा । कृष्णा पवार :-सुरगाणा शहरातील सर्व नागरिकांनी पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ सुरगाणा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शहर बंद करण्यात आले. 
       नागरिकांनी एकत्र येऊन दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांना कडक शासन करण्याची मागणी नागरिकांनी केली. या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. दहशतवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्याक्ष भरत वाघमारे, सुरेश गवळी, विजय कानडे, धर्मेंद्र पगारिया, प्रकाश वळवी, ज्ञानेश्‍वर कराटे, दीपक थोरात, राजेंद्र कानडे, मौलाना अबू नाईकडा, सचिन आहेर, सनी सोमवंशी, संतोष लाडे, भावडू चौधरी, वसंत बागुल, राहुल आहेर, पवन कोरीमुथा, अर्जुन शिंदे, रणजित पगारे, नितेश वाघ, बापू कानडे, अनिस पठाण, इस्माईल शेख, सागर जाधव, आबा गिरासे, प्रकाश जाधव, तुषार करवंन्दे, शुभम वाघ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने