maharashtratribalnews

वलखेडला कर्जदार शेतकर्‍यांचा मेळावा

दिंडोरी - मनोज पाटील 
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीबाबत कर्जदार शेतकर्‍यांचा मेळावा वलखेड येथे उत्साहात संपन्न झाला. 
अध्यक्षस्थानी शेतकरी नेते प्रकाश शिंदे होते. मेळाव्यामध्ये अनेक शेतकर्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यामध्ये खालील ठराव मंजूर करण्यात आले. मयत कर्जदारांसाठी देण्यात आलेली सवलत ज्याने कर्ज घेतले तो मूळ कर्जदार मयत होऊन त्याची वारस जरी लागलेली असतील तरी देखील मूळ कर्जदार या नात्याने मयत कर्जदारास असलेली व्याजमाफीची सवलत सदर खात्यावरील वारसांना लागू करावी, ज्या कर्जदारांनी मागील ओटीएसमध्ये पैसे भरलेले असतील त्यांनी भरलेल्या रकमेचा विचार नवीन ओटीएस लागू झाल्यानंतर त्यामध्ये करण्यात यावा, ओटीएस साठी मुद्दल विचारात घेताना शेतकर्‍याने घेतलेली पुनर्गठन किंवा रूपांतरण किंवा दोन्ही यांच्यापूर्वीची मूळ रक्कम विचारात घेतली जावी, ट्रॅक्टर किंवा इतर शेती उपयोगी वाहन कर्ज यांचा विचार ओटीएसमध्ये करताना पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज यांच्याप्रमाणे सवलतीस पात्र करण्यात यावा, नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांचे लेखा परीक्षण करण्यात यावे, सदर लेखापरीक्षणाचा अहवाल संस्था पातळीवर प्रत्येक सभासदास मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात यावा, येत्या एक ते दोन महिन्यात पूर्ण मुद्दल भरण्याची तयारी दाखविल्यास सदर कर्जदारांना व्याजात पूर्ण सूट देण्यात यावी. ज्या कर्जदारांची मुद्दलाचे समान हप्ते करून देण्याची मागणी असेल त्यांना तशी मुभा देण्यात यावी, कर्जदार शेतकर्‍यांच्या सातबारावर बँक किंवा संस्थेची नावे लागली असतील ती ती रद्द करून मूळ मालकाचे नाव पूर्वीप्रमाणे लावण्यात यावे, कर्ज योजनेत कर्ज भरल्यानंतर भविष्यात शेतकर्‍याला कर्ज घेण्यास अडचणी येतील असा कुठल्याही प्रकारचा शेरा किंवा नोंद सातबारावर मागे ठेवण्यात येऊ नये, करोना काळात निधन झालेल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा आश्वासनाला अनुसरून नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या सदर काळातील निधन झालेल्या कर्जदारांचे मुद्दल व्याजासह पूर्ण कर्ज माफ करण्यात यावें ैआदी ठराव मंजूर करण्यात आल्या आहे. प्रास्ताविक अभय सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन गोकुळ वडजे यांनी केले. आभार पंकज शिरसाठ यांनी मालने. मेळाव्यास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, कादवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे, विश्वासराव देशमुख, दिंडोरी बाजार समिती सभापती प्रशांत कड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, मोतीराम पाटील, भगवान बोराडे, कैलास बोरसे, गंगाधर निकाडे, विलास बोरस्ते, विलास भवर, चिंधु पगार, दत्तात्रय पाटील, सदाशिव शेळके, सुरेश शिरसाट, सोमनाथ मोकाट, रघुनाथ जगताप, रामनाथ ढिकले, भाऊसाहेब भंडारे, माणिक उफाडे, एकनाथ धनवटे, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते, जीवन मोरे, अनिल वडजे, संदीप उगले, गुलाब आहेर, शांताराम शेळके, शांताराम काळोगे, जगन भुसाळ, रघुनाथ पाटील, विनोद देशमुख, पांडुरंग उखर्डे, प्रशांत पाटील, गजानन खांदवे, मनोज खादवे आदी शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने