maharashtratribalnews

घराच्या पायाचे खोदकाम करताना बिबट्याचा हल्ला – शेतकरी गंभीर जखमी. -मांधा गावात भीतीचे वातावरण

बोरगाव l प्रतिनिधी  
घराच्या पाया चे खोदकाम करत असलेल्या मांधा येथील रहिवासी सिताराम मलू ठाकरे (४४) या शेतकऱ्यावर शुक्रवारी (दि.१८) रोजी सकाळी सहा ते साडेसहा वाजे दरम्यान बिबट्याचा हल््यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
सुरगाणा तालुक्यातील मांधा गावात शुक्रवारी सकाळी भीषण घटना घडली. आपल्या घरांच्या पायाचे खोदकाम करत असलेल्या शेतकरी सिताराम ठाकरे (४४) यांच्यावर शुक्रवारी सकाळी अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथम पांगारणे येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु, पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत मोठ्या आवाजाने बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावले आणि तातडीने मदतकार्य सुरु केले. नातेवाईक च्या मदतीने शेतकऱ्याला रुग्णालयात पोहोचवण्यात आले. सदर घटना समजताच उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटना स्थळांचा चा पंचनामा करण्यात आला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले की, “ही घटना अतिशय गंभीर असून ग्रामस्थांच्या मागणी नुसार बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे.
-
गावात भीतीचे वातावरण
घटनेनंतर मांधा गावात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाच्या वतीने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि अंधारात व एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- गणेश माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी, उंबरठाण.


---
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सिताराम ठाकरे सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने