maharashtratribalnews

मोहाडी येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी


 
मोहाडी l प्रतिनिधी ता.27 : दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बालसंस्कार केंद्राच्या मार्गदर्शनाने येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ यांच्या 147 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सकाळी नऊ ते साडेदहापर्यंत महिला व पुरुष स्वामी सेवेकरी यांनी श्री स्वामी चरित्रसारामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले. नंतर साडेदहाला नंदकुमार डिंगोरे यांच्या हस्ते नैवेद्य आरती आणि स्वामी नामाचा जयजयकार करून पूजन करण्यात आले. प्रसाद वाटप झाले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संगीता डिंगोरे, भारती डिंगोरे, सुनीता गाडगीळ, सानिका गाडगीळ, गायत्री गाडगीळ, मधुरा डिंगोरे, गायत्री डिंगोरे,भाग्यश्री हिरवे,अपर्णा डिंगोरे,राजेश्वरी काठे,दीपाली डिंगोरे, कुणाल डिंगोरे,आदी समर्थ सेवेकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने