नळवाडपाडा l प्रतिनिधी: -चाईल्ड सव्हाईव्हल इंडिया, परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, नळवाडपाडा ग्रामपंचायत आणि नळवाडी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नळवाडपाडा येथे जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात गर्भवती व स्तनदा मातांमध्ये स्तनपानाचे महत्त्व, योग्य पोषण आणि बालआरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये "योग्य जोडी लावा" हा माहितीपर खेळ, स्तनपानासाठी योग्य स्थितीचे प्रात्यक्षिक, डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच स्तनपान समर्थनासाठी स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. या सर्व उपक्रमांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला नळवाडपाडा गावाचे सरपंच हिरामण गावित, ग्रामपंचायत सदस्य पितांबर चौधरी, ग्रामसेविका ललिता खांडवी,नळवाडी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल्ला साळवे, चाईल्ड सव्हाईव्हल इंडिया संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ. अमोल येवला, फार्मासिस्ट पवन सोनवणे, हेल्थ एज्युकेटर प्रियंका चव्हाण व प्रवीण बैरागी, आरोग्य सेवक अभिजित हिरकुड, आरोग्य सेविका नूतन शिंगाडे तसेच आशा सेविका मनिषा गावित व गजरा महाले, सारिका चौधरी, अंगणवाडी सेविका कविता गवळी, संगीता वाघ, मंदा महाले व ग्रामस्थ उपस्थित होते.