maharashtratribalnews

कळवण येथे भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध

कळवण । दि.28 प्रतिनिधी
जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछुट गोळीबाराचा कळवण त्रिदल आजी-माजी सैनिक संघाने तीव्र निषेध करत परवानगी पत्र घेत कळवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभे यांना निवेदन दिले. दहशतवादींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काल कळवण बसस्थानक येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत कळवण त्रिदल आजी - माजी सैनिकांनी पायी मोर्चा काढला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येऊन दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना आजी माजी सैनिक संघाने श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांना कडक शासन करण्याची मागणी माजी सैनिक संघाने केली. या हल्ल्याचा सर्व सैनिकांनी तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी मोर्चांत कळवण तालुका त्रिदल आजी-माजी सैनिक संघाचे भास्कर पवार, धर्मा आहेर, गोविंद पगार, शिवाजी आहेर , भिला बच्छाव , हिरामण देवरे, उमेश जाधव, रघुनाथ पगार, अर्जुन पाटील, बाळासाहेब गांगुर्डे, सुकदेव पगार, दगाजी राजगिरे, सावळीराम बागुल, जगन्नाथ शिंदे, कडू पगार, अनिता कदम, सुमती आठवले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने