वणी । प्रतिनिधी:- दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजार आवारात शुक्रवारी 550 नगाची आवक झाली असून 1400 ते 1900 रुपये प्रति क्विंटल कांद्यास दर मिळाला. पाऊस उघडल्यानंतर कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. पावसाने भिजलेला कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आला असून भिजलेला कांद्यास प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपये दर मिळाला आहे. 70 टक्के भिजलेल्या कांद्याची आवक बाजारत आली आहे. सुका कांद्यास 1400 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. शेतकर्यांनी आपला कांदा प्रतवारी करून बाजारात आणावा जेणे करून कांद्यास योग्य भाव मिळेल असे आवाहन सभापती प्रशांत कड यांनी केले आहे. गेल्या महीनाभरापासून अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी केलेला खर्च देखील कांदा पावसात भिजल्याने निघत नसल्याचे शेतकर्यांनी सांगीतले. तरी शासनाने पंचनामें करून सरसकट नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.