maharashtratribalnews

जाधव वस्तीवर बिबट्या जेरबंद

दिंडोरी l मनोज पाटील:- दिंडोरी येथे जाधव वस्तीवर परवा रात्री बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार झाले होते या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला होता त्याचप्रमाणे बिबट्याचे शोधासाठी पथके पाठवली होती काल रात्री ज्या ठिकाणी रुद्र अमोल जाधव यांचे शो मिळून आले होते त्या ठिकाणी पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे मादी असून तिचे वय तीन वर्षे आहे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रुद्र चा बळी घेणारे हे मादी आहे की दुसरा बिबट्या आहे याबाबत खात्री होऊ शकले नाही. वनविभागाने पिंजरा सहित बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना नाशिक येथे त्याला पाठवण्यात आले आहे वनविभागाच्या अधिकारी अशोक काळे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे बिबट्यांचा अजूनही उच्चार सुरू असून काल रात्री शाम विष्णू जाधव यांच्या घराकडे दोन बिबटे महिलांना दिसून आले वन विभागाने तातडीने केंद्रांची व्यवस्था करावी अशी मागणी दिंडोरीचे सामाजिक कार्यकर्ते रमेश बोरस्ते नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने