महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जागतिक पर्यावरण दिन साजरा

कळवण । प्रतिनिधी :- कळवण ( मानूर) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या परिसरात विविध जातींच्या रोपांची वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एस. पगार म्हणाले की, आज भारतासारख्या देशात पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वृक्षांची कमी होणारे प्रमाण तसेच नद्या व जल प्रदूषण आणि कृषीच्या माध्यमातून होणारे जमिनीचे प्रदूषण त्यामुळे कार्बनच्या प्रमाणात होणारी वाढ व वाढते उष्णतेचे प्रमाण यामुळे पर्यावरण दूषित होऊन समतोल ढासळत चाललेला आहे. मानवाने पर्यावरणाच्या संदर्भात बेफिकीर न राहता पर्यावरणीय साक्षर होण्याची गरज असून पर्यावरण संवर्धन राखणे मानवाच्या हितासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण, नैसर्गिक शेती, प्रदूषण मुक्त परिसर याबाबतीत समाजात जनजागृती व्हावी हा या दिनामागचा उद्देश आहे असे ते म्हणाले. वृक्षांचे संवर्धन महत्वाचे असून त्यातून जैवविविधता व परिसंस्था टिकवणे मानवाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे अशीही ते म्हणाले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. एस. एम .पगार, डॉ. व्ही. एम. पगार, डॉ.डी .पी .भदाणे, कैलास गोसावी, राजेंद्र बर्गे, रामदास जोपाळे, गोरख बागुल आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने