पेठ । प्रतिनिधी :-पेठ तालुका डीवायएफआय, मार्क्सवादी कम्युनिस्टपक्ष, भाकपा, जनहितवादी महीला संघटनेच्या वतीने जनतेच्या विविध अडीअडचणी व मागण्यांबाबत तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
या आदोंलनात प्रामुख्याने जनतेला भेडसावणार्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांची सोडवणूक करण्यात यावी या करिता सबंधित विभागांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा झाली. तालुक्यातील सुरू असलेल्या रस्ते, जलजीवन मिशन योजनेतील कामांची झालेली वाताहत, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर न मिळणारा लाभ, वनदावे कामात होत असणारी दिरंगाई, पेठ नगरपंचायतीतील अनागोंदी कारभार आदी विभागातील कामांच्या अनियमितेबाबत ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने काही काळ आदोंलन कर्त्यांची तारांबळ उडाली. नंतर तहसिल कार्यालयातील आवारातील डोममध्ये ठिय्या दिला. चर्चेदरम्यान येत्या सात दिवसांत मागण्याची पूर्तता केली जाईल असे आश्वाासन प्रशासनाच्या वतीने दिले. दि.13 जुन रोजी पुन्हा आढावा बैठक घेण्यात यईल त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी डीवायएफआयचे तालुकाध्यक्ष कमलाकर बोसारे, जनहितवादी महिला संघटनेच्या अफरोजा शेख, छबिलदास आवारी, तुकाराम मोंढे, मुरलीधर भोये, शाम भोये, पुष्पराज गावीत, राजु शेख, छबिलदास भुरकुड, नारायण दरोडे, मुरलीधर निंबेकर, मुरलीधर जाधव, देवा गवळी, हरिभाऊ, सातपुते, चंदर जाधव, रामदास जाधव, देविदास गायकवाड आदी उपस्थित होते.