दिंडोरी तालुक्यातील वणारवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेत पायल चव्हाण ह्या तरुणीने आपले प्राण गमावले . ह्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. पायल ही दिंडोरी च्या मराठा विद्याप्रसारक महाविद्यालयाची विद्यार्थीनी होती . ती वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्ष्यात शिक्षण घेत होती . कालच तिचा निकाल लागला असून त्यात सर्वच विषयांत पायल ए ग्रेड ने उत्तीर्ण झाली आहे . व वाणिज्य विषयात पदवीधर झाली . परंतु हे यश बघण्यास पायल नाही . हुशार व होतकरु विद्यार्थिनी होती. तिच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .