बाऱ्हे l दीपक देशमुख:- सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे पोलीस स्टेशन येथे बाऱ्हे पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सपोनि.राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.पोलिसांना धकाधकीच्या जीवनात वेळेवर झोप नसणे, वेळेवर जेवण न करणे या कारणामुळे विविध व्याधी जडल्या जातात. पोलीस अधिकारी व अंमलदार कामाच्या ओघात आरोग्याकडे लक्ष राहत नाही.त्यामुळे पोलीस व पोलीस पाटलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिराचे आयोजन केलेबाबत सपोनि. राखोंडे सो. यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ राजेंद्र बोरसे सर व एन सी डी चे वैद्यकीय अधिकारी डॉ विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक केदारनाथ झिरवाळ, आधीपरिचारिका हेमलता भुसारे व स्टेमी ई सी जी प्रोजेक्ट चे कर्मचारी पुष्पराज आचारी तसेच इतर कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन चे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांचे आरोग्याच्या दृष्टीने ई.सी.जि, शुगर, ब्लड प्रेशर तपासणी करण्यात आली.