दिंडोरी l मनोज पाटील :- पूर्वी प्रत्येक ऋतूत त्या प्रमाणे वातावरण बदल व्हायचा भरपूर पाऊस पडायचा परंतु पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने ऋतू चक्र बदलत आता केव्हाही वर्षभर उष्णता, पाऊस अन थंडी पडत आहे जंगलतोड झाल्याने वन्य प्राणी नागरी भागात येत आहे वसुंधरेला मोठा धोका निर्माण झाला असून पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज आहे सर्वांनी झाडांची लागवड करत त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केले.
दिंडोरी येथे जनता विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन निमित्त सामाजिक वनीकरण विभाग दिंडोरी यांचे तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम नगरसेवक सुजित मुरकुटे, नितीन गांगुर्डे, प्राचार्य शरद शेजवळ, सामाजिक वनीकरण वनपरीक्षेत्र अधिकारी सुचिता पाटील, वन अधिकारी वसुधा आहिरे पर्यवेक्षक रावसाहेब उशीर,लक्ष्मण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी भगवान गायकवाड होते.त्यावेळी नितीन गांगुर्डे बोलत होते.
यावेळी प्राचार्य शरद शेजवळ यांनी पर्यावरण संतुलन साठी राबवत असलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना पर्यावरण संतुलनाचे महत्व विषद करत शाळेत प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावणे व त्यांचे संगोपन करण्यात येणार असल्याचे सांगितले. परिसरात बिबट्या चा प्रार्दूभाव वाढला असून सर्व विदयार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे सांगितले. भगवान गायकवाड यांनीही वृक्ष लागवडीचे महत्व विषद करत वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे आवाहन केले. आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक प्रमोद सोनवणे यांनी केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना पर्यावरण शपथ देण्यात आली.