सुरगाणा । कृष्णा पवार :- सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा (दिगर) येथे उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी गणित, इंंग्रजी विषयाचे शिबिर उत्साहात पार पडले.
उन्हाळी सुट्टी जवळपास दीड महिन्याची असते व यामुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विविध उपक्रम आणि आनंददाई शिक्षण मिळावे, यासाठी उंबरपाडा गावचे होतकरू तरुण शिक्षक नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सावर्धक उन्हाळी वर्गाचे आयोजन सुरु केले. त्यासाठी पालकांचे सहकार्य लाभले. महिनाभर हे वर्ग विविध उपक्रम, गणित, इंग्रजी स्पर्धा परीक्षेचा पाया असणारे विषय, जनरल नॉलेज, इंग्रजी फोनिक्स, बौद्धिक खेळ यासारखे विषय घेत मुलांना शिक्षणाची अधिक गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे वर्ग अविरत सुरु असताना यासाठी गावातील विविध सुजाण नागरिकांनी या वर्गासाठी देणगी देत आर्थिक, वस्तुस्वरूप मदत करत या वर्गाला अधिक प्रोहसाहीत केले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्याबरोबरच उद्याच छान सुंदर गावचे भविष्य घडवण्यासाठी अतिशय सुंदरपणे या उपक्रमासाठी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. चिमुकल्याना या शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी स्वदेश फौंडेशन व गरुडझेप जेनसेवा फॉऊडेशन तसेच ग्रुप ग्रामपंचायत उंबरपाडा, सर्वच नोकरदार, मित्रमंडळांचा याकामी महत्वाचा वाटा आहे. यासाठी या वर्गासाठी शिक्षक म्हणून नामदेव पवार, सुनिल गायकवाड, प्रा. माणिक चौधरी, दुर्वादास गायकवाड, गौरव गायकवाड, विनायक पवार यांना मदत करण्यासाठी रोहिणी गोपाळ गायकवाड, रोहिणी हिरामण पवार, लता पवार यांनी समाजकार्य म्हणून शिकवण्यासाठी सहकार्य केवळ गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतून विविध स्तरातून आणि पालक वर्गातून कौतुक होत आहे.