वणी l प्रतिनिधी :- मविप्र समाज संस्था संचलित येथील खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी (दि.. ६) शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे व्हिडीओ द्वारे ऑनलाईन उदघाट्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सकाळी दहा वाजेला होणार आहे. कार्यक्रमात येथील सह्याद्री देवराईचे सदस्य दत्ता जाधव यांचे 'पर्यावरण संरक्षण 'या विषयावर व्याख्यान होणार आहे. सरपंच आशा लहांगे, शिक्षणाधिकारी डॉ. विलास देशमुख प्रमुख अतिथी असतील. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संचालक प्रवीण जाधव, आयटीआयच्या प्राचार्या माया वारुंगसे यांनी केले आहे.
मोहाडी आयटीआयमध्ये उद्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0