बा-हे l नामदेव पाडवी:- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक,उच्च माध्यमिक व न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल ओतूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षाचा शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पवार,पर्यवेक्षक राजेंद्र अहिरे,सरपंच पार्वत गांगुर्डे, उपसरपंच प्रकाश आहिरे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शांताराम मोरे,मंगेश देसाई, युवराज मोरे, शाबान पठाण आदी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आली.
त्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत व नविन पाठयपुस्तक वाटप,10 वी व 12 वी मध्ये गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आली.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पवार यांनी शैक्षणिक वर्षात कोणते कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत याविषयी माहिती सांगून विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना शिरा व खिचडी देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन कुलकर्णी यांनी केले. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने पालक,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.