maharashtratribalnews

७१ आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

सुरगाणा l कृष्णा पवार:- ए.टी. पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना, उलगुलान कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने दुसरा ७१ जोडप्यांचा सामुदायिक आदिवासी विवाह सोहळा मु. आवळपाडा, पो. भवाडा ता. सुरगाणा येथे मोठ्या थाटात पार पडला. वधू-वरांस नवीन ड्रेस-साडी, मनी मंगळसूत्र संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार माननीय नितीन भाऊ पवार, माजी जिप अध्यक्षा जयश्रीताई पवार, शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) मोहनभाऊ गांगुर्डे, आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेचे प्रवक्ते जिल्हा सरचिटणीस देवा वाटाणे यांनी वधू-वरांस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.!.
   विशेष अतिथी म्हणून आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना कोअर कमिटी सदस्य माननीय शशिकांतजी मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिराताई डोळस, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ गोतरणे, दत्ता कडाळे निफाड तालुका अध्यक्ष , जिल्हा उपसरचिटणीस तथा कोठुरे पोलीस पाटील सोपान सताळे, सुरगाणा तालुकाध्यक्ष युवराजभाऊ लोखंडे, उपतालुकाध्यक्ष मोहनभाऊ जाधव, जिल्हा संघटक वाळू गुंबाडे, किरण बुचडे, माजी जिप सदस्य गोपाळराव धूम, यांसह  वधू-वरांचे नातेवाईक मित्रपरिवार, आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने  वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुरगाणा तालुका सरचिटणीस देविदास वार्डे,  एकनाथ दळवी, केशव वार्डे, सदू महाले, जगन महाले, जयराम वार्डे, रामदास वार्डे, यशवंत धामोडे आदींनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने