महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीत एस.टी.चा वर्धापन दिन उत्साहात

दिंडोरी ।  मनोज पाटील:- दिंडोरी येथील बसस्थानकात एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    महाराष्ट्राच्या दळणवळणाला चालना मिळावी, या हेतूने दि.1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर धावली होती. त्या दिनाचे औचित्य साधून दिंडोरी येथेही बसस्थानकात वाहतूक निरीक्षक अनिल निमसे यांच्या हस्तेे उदघाटन करण्यात आले. यावेळी संपूर्ण बसस्थानक फुलांनी सजवण्यात आले होते. एस.टी.बसचा फुल हार घालून व श्रीफळ वाढवला. प्रवासी बांधवांनाचेही फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ललित सूर्यवंशी वाहतूक नीचेत्रवक ललित सूर्यवंशी, वाहक हरिदास चौधरी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी व्यापारी गाळ्याचे चालक संजय कस्तुरे,भरत रावल, पवन कस्तुरे, चालक सुनील निंबादे, वाहक संगीता भोये आदींसह बसस्थानकातील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने