महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बोरगाव - खरुडे रस्त्याची दुरवस्था, वाहनचालक त्रस्त.

बोरगाव l प्रतिनिधी :- सुरगाणा तालुक्यातील बोरगाव - खरूडेमार्गे कळवण तालुक्यातील खिराड या महत्वाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. परिसरातील ग्रामस्थांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने बोरगाव ते खरुडे हे ४ किलोमीटर अंतर जाण्यासाठी एक तास लागत असल्याने रस्त्यात किती खड्डे पडले असतील याचा अंदाज येतो.            खड्डे चुकवितांना वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने शेतकरी व प्रवासी चिंताग्रस्त झाले आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक व वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करावी अशी मागणी रघुनाथ भोये, जगदीश जोपळे, पुंडलिक धुळे, सचिन राऊत, राजेंद्र ठाकरे व वाहन चालकांनी केली आहे.
--
संबंधित विभागाने तात्काळ रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अन्यथा आदिवासी आसरा फाउंडेशन च्यावतीने बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
- पंकज चव्हाण, आदिवासी आसरा फाउंडेशन सचिव.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने