महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडपाणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडपाणी येथे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती , नाशिक. फिरता दवाखाना आपण आपल्या गावात कॅम्प आयोजित केला होता, त्यात आपल्या लोकांना दूषित पाण्यामुळे खोकला, सर्दी, ताप असे बरेचसे लोकांना आजार होते जवळपास 100/150 लोकांनी ट्रीटमेंट घेतली , केस पेपरची फी 10 रुपये असून ही दहा रूपये फी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडपाणी शाळेच्या विद्यार्थ्यांची फी चे पैसे न घेता शाळेच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.व तपासणी करून सर्व विद्यार्थ्यांना गोळा औषधे देण्यात आले.
आरोग्य तपासणी वेळी उपस्थित मान्यवर मा.श्री.निलेश भाऊ मोहंडुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडपाणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडपाणी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मा.श्री.सुरेंद्र भाऊ बुधर व मा.श्री.दादा भाऊ बुधर सामाजिक कार्यकर्ते भावी जिल्हा परिषद सदस्य ठाणापाडा गट तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मा.श्री.रमेश साबळे सर व शिक्षक मा.श्री.विराज गांगडे सर व शिक्षक पंढरीनाथ गावित सर आणि बाळु वळवी,काळुदास वाढु, नामदेव वाढु, जयराम बरफ, दशरथ बरफ, भगवान बुधर ग्रामपंचायत सदस्य लहुदास भाऊ बरफ आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष यांच्या सहकार्यातून शाळेमध्ये आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने