महाराष्ट्र ट्रायबल न्युज

भाग्यश्री चौधरीची मुबंई पोलिस दलात नियुक्ती

म्हेळुस्के l प्रतिनिधी:-दिंडोरी येथील अग्निपंख अकॅडमीची विद्यार्थीनी तथा म्हेळुस्के येथील रहिवाशी असलेली भाग्यश्री दत्तू चौधरी हिची नुकतीच मुंबई पोलिस दलात वाहन चालक पदावर नियुक्ती झाल्याने म्हेळुस्के ग्रामस्थांसह चौधरी कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून तीच्या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    गेल्या तीन वर्षांपासून दिंडोरी येथील अग्निपंख अकॅडमीत संचालक सागर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री पोलिस दलात रुजू होण्यासाठी कठोर मेहनत घेत होती.आज अखेरीस तिच्या मेहनतीला यश आले असून लवकरच ती आपल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू होणार आहे.भाग्यश्रीची म्हेळुस्के गावातून प्रथम महिला म्हणून पोलिस दलात नियुक्ती झाल्याने म्हेळुस्के ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी तिचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करून शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.तिच्या यशात तिचे आई -वडील,कुटुंबीय व संचालक सागर वानखेडे,प्राध्यापक आकाश सर यांची मोलाची साथ लाभली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने