महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कै. जाधव मित्रमंडळांकडून रुग्णवाहिका भेट

दिंडोरी । मनोज पाटील:- दिंडोरी येथील कै. मधुनाना पोपटराव जाधव यांच्या स्मरणार्थ कै. मधुनाना जाधव मित्रमंडळ यांच्याकडून ना. नरहरी सिताराम झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांना रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या रुग्णवाहिकेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. 
ना. नरहरी सिताराम झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून दिंडोरी, पेठ या आदिवासी भागात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. आदिवासी भागातील गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. त्यासाठी कै. मधुनाना पोपटराव जाधव यांच्या स्मरणार्थ कै. मधुनाना जाधव मित्रमंडळ यांच्याकडून ना. नरहरी सिताराम झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांना रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या रुग्णवाहिकेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, गणपतराव पाटील, विश्‍वासराव देशमुख, कैलास मवाळ, विक्रम मवाळ, परिक्षित देशमुख, कैलास देशमुख, प्रतीक जाधव, जयवंत जाधव, भगवान जाधव, योगेश जाधव, गुलाब जाधव, किरण जाधव, आकाश जाधव, समाधान अपसुंदे यांच्यासह कै. मधुनाना जाधव मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

 रुग्णाला वेळेत उपचार मिळाले, तर तो निश्चितपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत अत्यावश्यक आहे. आरोग्यसेवेत ना. नरहरी सिताराम झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. या कार्यामुळेच त्यांच्या मागणीवरून त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली. पेठ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील या रुग्णवाहिकेचा गरजू रुग्णांना मदत होईल. गोरगरीब रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा.
             - प्रतीक जाधव, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिंडोरी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने