महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अलंगुण आश्रम शाळेच्या 14 वर्ष वयोगट मुलांचा संघ विभाग पातळीवर

बोरगाव l लक्ष्मण बागुल :- दि.26 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक जिल्हा, शालेय क्रीडा स्पर्धा 2025 अंतर्गत नाशिक येथे पार पडलेल्या 14 वर्ष वयोगटातील जिल्हा स्तरीय खोखो क्रीडा स्पर्धेत,.आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण या शिक्षण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम अलंगुण या आश्रम शाळेतील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात एकहाती विजय मिळवत दिमाखात विभाग स्तरावर झेप घेतली. 
      नाशिकच्या मीनाताई ठाकरे स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील खोखो संघांनी सहभाग घेतला होता, या संघामधून अलंगुण संघ विजेता ठरला, अंतिम सामन्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी संघांने सुरगाणा तालुक्याच्या अलंगुण संघांचे 4 गडी बाद केले. उत्तरादाखल अलंगुण संघाने मात्र जोरदार आक्रमन करत मुरंबी संघांचे 14 गडी बाद करून मोठी आघाडी घेतली, दुसऱ्या डावात अलंगुण संघांचे फक्त 5 गडी बाद झाले, त्यामुळे अलंगुण संघाने हा सामना एक डाव आणि 5 गुणांनी सहज जिंकला. विजयी संघातील विवेक वाघमारे, निलेश धूम, जितेंद्र खांडवी, प्रकाश धूम, महेंद्र गायकवाड, सुरेश गारे, प्रकाश गोतुर्णे यांनी उत्कृष्ठ आक्रमन व उत्कृष्ट बचाव करून उपस्थित क्रीडा रशिकांची व खेळ प्रेमींची मने जिंकली. यावेळी खोखो अल्टीमेट खेळाडू दिलीप खांडवी, माजी राष्ट्रीय खेळाडू गणेश राठोड, दिनेश राठोड, जगन, मच्छिन्द्र, राहुल, चंद्रकांत, मनोज खेळाडू उपस्थित होते..
       सालाबाधाप्रमाणे यावर्षीही जिल्हा स्तरावर संस्थेच्या अलंगुण आश्रमशाळेने विजय संपादन केल्याने संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कॉ जे पी गावीत, संचालक मंडळ, समन्वयक, मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी विजयी संघातील खेळाडू, मैदानावर मेहनत घेणारे क्रीडा शिक्षक श्री योगेश माळवाळ, निवृत्ती लांडगे , रामचंद्र गांगुर्डे, गंगाराम गावीत, महेश पवार , प्रवीण बागुल, मनोज वाघ, राजेंद्र पवार, यांचे अभिनंदन केले व विभाग स्तरासाठी शुभेच्छा दिल्या...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने