महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मौजे बोरवठ ता पेठ येथील गट न 9, 16,23 मधील शेतकरी यांचा अंदाजे 2 किमी रस्ता सामंजस्याने खुला केला

माळेगाव l धर्मराज चौधरी:- महसूल सेवा पंधरवड्यात करंजाळी येथे मंडळ स्तरावर सुनावणी घेत वादांकित रस्ता बाबतचा वादी व प्रतिवादी यांना विश्वासात घेऊन समझोत्याने रस्त्याचा वाद मिटवण्यात आला.
    महसूल सेवा पंधरवडा निमित्ताने शेत स्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात वादांकित रस्त्यांबाबत यादी करण्यात आली.
त्यानुसार करंजाळी मंडळ कार्यालय येथे मौजे बोरवठ येथील दाखल अर्ज नुसार मामलेदार कोर्ट ऍक्ट १९०६ चे कलम ५ (२) अन्वये वादी व प्रतिवादी यांची मंडळ अधिकारी कार्यालय करंजाळी या ठिकाणी सुनावणी घेण्यात आली.
     मंडळ स्तरावर सुनावणी मध्ये सदरचा वादांकित रस्ता वादी व प्रतिवादी यांना विश्वासात घेऊन शेतकरी यांचा समझोता करण्यात आला.त्यामुळे 14/15 शेतकऱ्यांना लाभ झाला असून 2किमी रस्ता खुला करण्यात आला यावेळी तहसीलदार श्रीम आशा गांगुर्डे , मंडळ अधिकारी श्रीम.स्वप्ना म्हस्के, तलाठी श्रीम. भारती गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने