महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील परिसरात स्वच्छता करण्यात आली.

बोरगाव l लक्ष्मण बागुल:- सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बोरगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीेने परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता करुन जवळपास एक ट्रॅक्टर कचऱ्याचे जमा करून विल्हेवाट लावण्यात आली. ग्रामपंयतीचे ग्रामविकास अधिकारी सुकदेव बागुल व सरपंच अशोक गवळी मार्गदर्शनाखाली सरपंच अशोक गवळी यांच्यामार्गदर्शनाखाली 
ग्रामपंचायत, दवाखाना, मंदिर व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.   
  यावेळी गावातील ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, महिला बचत गट, धैर्यशील राव पवार विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने