महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आदर्श शिक्षक 2025 गुणगौरव समारंभात सुरगाण्याचे भामरे सर सन्मानित

बोरगाव l लक्ष्मण बागुल :- २२ सप्टेंबर २०२५ रोजी शारदीय नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक येथे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघ व विजन नाशिक विभागीय कला शिक्षक महासंघ यांच्या वतीने आदर्श शिक्षक २०२५ गुणगौरव समारंभ पार पडला.
   या कार्यक्रमाला दिंडोरीचे खासदार माननीय श्री. भास्कर भगरे, शिक्षक आमदार माननीय श्री. किशोर भाऊ दराडे, पदवीधर आमदार माननीय श्री. सत्यजित तांबे, श्री. कोंडाजी आव्हाड, श्री. प्रल्हाद साळुंखे, श्री. विश्वास ठाकूर, श्री. मोहन चकोर, श्री. आर. डी. निकम, श्री. एस. बी. देशमुख, श्री. बी. टी. भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरगाणा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, सराड चे मुख्याध्यापक श्री. संदीप राघो भामरे यांना आदर्श मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या गौरवाने सराड शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आनंदित झाले असून त्यांनी श्री. भामरे यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
  तसेच सराड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. नामदेव भोये, श्री. जनार्दन भाऊ भोये, श्री. हरिभाऊ भोळे, श्री. कांतीलाल भोये, श्री. सखाराम भोये, श्री. किसन भोये आदी मान्यवरांनीही शुभेच्छा देऊन भामरे सरांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने