महाराष्ट्र ट्रायबल न्युज

राशा ग्रामपंचायत अंतर्गत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वृक्ष लागवड उत्साहात

बोरगाव l प्रतिनिधी :- दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोरचोंड येथे वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात पेसा समिती अध्यक्ष वसंत गाडर, सरपंच सिताराम हरी भोये,उखाराम लक्ष्मण गावित, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर वाघेरे, संगीता कृष्णा गावित, भोवान गावित, श्री. गोपाळ पवार यांसह इतर ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
वृक्ष लागवड करून ग्रामविकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संकल्प ग्रामस्थांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने