बोरगाव l लक्ष्मण बागुल:- गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनजाती समाजाच्या प्रगतीसाठी "धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान" अंतर्गत आदी कर्मयोगी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी दि 23सप्टेंबर 2025 रोजी बुबळी (ता.सुरगाणा) येथे करण्यात आले.
सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. टी. सुर्यवंशी व विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, माधवराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी नरेंद्र भागवत यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत बुबळी येथील सरपंच श्री.मनोहर राजाराम राऊत तसेच गटातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्या उपस्थितीत तसेच स्थानिक जनप्रतिनिधी, समाजातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी भदर, प्रतापगड, खोकरी, खोबळा, हतरुंडी, भोरमाळ, करंजुल सु, भवानदगड, हट्टी, लाडगाव, बुबळी, बिवळ, कुकुडमुडा, माणी, मालगव्हाण येथील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी अल्पा देशमुख यांनी या अभियानाचा उद्देश जनजाती समाजाच्या शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण तसेच रोजगार निर्मिती या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणे हा आहे . महिलांसाठी स्वावलंबनाशी संबंधित मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच यांनी ग्राम उत्कर्ष अभियानामुळे गावाचा विकास, जनजाती समाजाचे आत्मनिर्भर भविष्य आणि धरती आबा यांच्या विचारांची प्रेरणा पुढे नेण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एकमुखाने ग्रामविकासासाठी सहकार्य करण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमामुळे जनजाती समाजात नवचेतना निर्माण झाली असून ग्राम उत्कर्ष अभियान गावाच्या प्रगतीस नवा वेग देईल , असा विश्वास ग्रामपंचायत अधिकारी गणेश गावित यांनी व्यक्त केला. व सर्व मान्यवरांचे उपस्थित ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.
प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी गणेश गावित, रामराव महाजन यांनी परिश्रम घेतले.