सुरगाणा l कृष्णा पवार:- अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, भेगुसावरपाडा येथील एकूण 25 विद्यार्थ्यांची मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ प्रकारांत जिल्हास्तरावर निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कॉम्रेड जे. पी. गावित साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शाळेचे प्राचार्य तसेच मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून शुभेच्छा व्यक्त केल्या. यशस्वी घडवून आणण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतलेल्या क्रीडाशिक्षकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या कामगिरीमुळे शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले असून पुढील स्पर्धांमध्ये हे विद्यार्थी अधिकाधिक यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.