महाराष्ट्र ट्रायबल न्युज

हेलपिंग हैंड फाऊंडेशन कडून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- सुरगाणा तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजुल (पे ) येथील विद्यार्थ्यांना हेलपिंग हैंड फाऊंडेशन, ठाणे, मुबंई यांच्याकडून मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मोफत अन्नदान वाटप करण्यात आले.
      या कार्यक्रमाप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष रमाकांत सर, नरेश सर, यश सर व पुंडलिक सर, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा जाधव, सिताराम पाडवी, रमेश वाघमारे, मुरलीधर वाघमारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगीता वाघमारे, मुख्याध्यापक तुषार चौरे, शिक्षक हेमंत वाघेरे, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका  यांच्यासह गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने