महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पंचायत समिती सुरगाणा "स्वच्छ ही सेवा अभियान" १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५

बोरगाव l लक्ष्मण बागुल:- ग्रुप ग्रामपंचायत हतगड (किल्ला) तालुका सुरगाणा येथे स्वच्छ भारत (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत एक तास, एक दिवस, महाश्रमदान मोहीम मा.मुख्यकार्यकारी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक व मा. उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पावस्व) जिल्हा परिषद नाशिक व मा. गटविकास अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली स्वच्छता ही सेवा अंतर्गत मा.गटविकास अधिकारी श्री.जे. टी. सूर्यवंशी साहेब , तालुका आरोग्य अधिकारी श्री. डॉ. दिलीप रणवीर साहेब. उप अभियंता ग्रा.पा.पु. श्री. विवेकानंद निकम साहेब, पशुधन अधिकारी श्री.नरेंद्र भागवत, सहाय्यक प्रशासन अधिकारी, श्री. राजेश वाघेरे साहेब, विस्तार अधिकारी(ग्रा.प) श्री.आर.एस.झिरवाळ साहेब,विस्तार अधिकारी (ग्रा. पं) श्री.एम.पी.गावित विस्तार अधिकारी आरोग्य. श्री.शुभम बैरागी साहेब वनविभागाचे अधिकारी यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन ग्रामपंचायत हतगड(किल्ला) येथे स्वच्छता करण्यात आली , व स्वच्छता रॅली, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत इ प्लेज घेण्यात आली यावेळी सरपंच महोदय श्री देविदास दळवी साहेब ,ग्रा.प.सदस्य, सुरगाणा गटातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी,समूह समन्वयक श्री.दिलीप गांगुर्डे, sbm इंजिनिअर श्री. नितीन गावित तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने