महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वागळूद येथे पोषण आहार सप्ताह कार्यक्रम आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

दिंडोरी l मनोज पाटील:- दिनांक 08 सप्टेंबर २०२५ रोजी पर्नोड रिकार्ड इंडिया, चाईल्ड सर्वायवल इंडिया, ग्रामपंचायत वागळूद व प्रा.आ.केंद्र वरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने वागळुद येथे पोषण आहार सप्ताह कार्यक्रम आणि मोफत (NCD) रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोषण आहार कार्यक्रमात एकूण 65 ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
   पोषण आहारावर जनजागृती या कार्यक्रमात करण्यात आली .यावेळी मेडिकल ऑफिसर डॉ अनुजा जाधव यांनी पोषण आहाराचे महत्व या विषयावर अभ्यासपूर्ण सत्र घेतले .खेळाच्या माध्यमातून देखील महिलांना पोषण आहाराची माहिती दिली .
   NCD शिबिरात एकूण 36 रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये 123 विविध चाचण्या करण्यात आल्या. 
    सदर कार्यक्रम सरपंच मंगल वाघ ,आशा वर्कर शालिनी धुळे , अंगणवाडी सेविका सगुणा नवले, जिल्हा परिषद शाळेचे जोपळे सर व वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे फ्लेबोटोमिस्ट राहुल विधाते ,चाईल्ड सर्वायवल इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र आहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुजा जाधव, फार्मासिस्ट पवन सोनवणे, हेल्थ एज्युकेटर सोनाली शेलके, प्रवीण बैरागी,तुषार साबळे यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने