दिंडोरी l वैभव पगार : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी येथील महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य आदरणी डॉ. संजय काळोगे हे होते. तर प्रमुख वक्ते कॉलेजचे जेष्ठ अध्यापकाचार्य प्रा. श्री.एस जे. शिंदे सर होते. प्रा.शिंदे सरांनी आपल्या भाषणात भारतीय शिक्षणाचा आराखडा व NEP ने त्यात केलेले बदल यांचा तुलनात्मक अभ्यासात्मक विश्लेषण केले. तसेच भावी शिक्षकाने आपल्यात कोणते बदल करावे तसेच भविष्यात आलेले आव्हाने कशा स्वरूपात असतील यावर प्रकाश टाकला.भारताचे माझी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनन् यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. कॉलेजचे अध्यापकाचार्य श्री.एम.आर.धामणे सर यांनी आपल्या प्रस्ताविकात शिक्षक दिन का साजरा केला जातो. तसेच शिक्षक दिन साजरा करण्याचा इतिहास यावर सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रम प्रसंगी प्रथम वर्ष छात्राध्यापिका दिपाली भांगरे, पायल शार्दूल तसेच द्वितीय वर्ष छात्राध्यापिका योगिता ठाकरे यांनीही आपल्या भाषणात शिक्षक व शिक्षकांचे योगदान यावर भाषणे व कविता तसेच कार्यक्रमांचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांनीही मोलाचे मागदर्शन केले. यावेळी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याही सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्राचार्यांचा सत्कार शितल बोरसे, जेष्ठ अध्यापकाचार्य एस.जे शिंदे सरांचा सत्कार धनश्री वाघ, श्री. पी.एन.बोराडे सरांचा सत्कार धनश्री बोरस्ते,श्रीमती एस.एम.ठाकरे मॅडमचा सत्कार पंकज भोये, श्री.डॉ. अनिल भोळे सरांचा सत्कार गायत्री खेरनार, श्रीमती डॉ. प्रतिभा जगताप मॅडमचा सत्कार दिपक महाले, श्री.एम.आर.धामणे सरांचा सत्कार भावना बागुल, श्री.एम.बी. लिलके सरांचा सत्कार साक्षी महाले, ग्रंथपाल श्रीमती एस.एस.पाटील मॅडमचा सत्कार शितल गायकवाड, श्री. बाबा मोरे भाऊसाहेबांचा सत्कार धनराज धूम, श्री.केशव कराटे भाऊसाहेबांचा सत्कार माधव सातपुते, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. नारायण वरखेडे यांचा सत्कार प्रदीप लहांगे, श्री.गवित मामा यांचा सत्कार लीना गावित, श्री.सोमनाथ उखर्डे मामाचा सत्कार तुषार चव्हाण, श्री. ज्ञानेश्वर कदम मामाचा सत्कार योगेश जाधव यांनी गुलाबपुष्प देवून केला.
सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.डॉ अनिल भोळे, उपप्रमुख प्रा श्रीमती स्मिता ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष छात्राध्यापक कु. वैभव राऊत याने केले.तर आभार कु. गांगुर्डे साक्षी हीने मानले, फलक लेखन शितल गायकवाड, धनराज धूम, पंकज भोये यांनी केले, तसेच पंकज भोये, दिपक महाले, यांनी फोटो काढले प्रथम वर्ष छात्राध्यापिका महानभाव रोशनी,दिक्षा मोरे व द्वितीय वर्ष छात्राध्यापिका भोये अश्विनी, बोरसे शितल, कळमकर सानिका, कामडी अंकिता, कामडी ज्योती, योगेश जाधव, यांनी कार्यक्रमांसाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका श्रीमती.डॉ.जगताप पी.जी. श्री.धामणे एम.आर.,श्री.ठोंबरे जे.आर., ग्रंथपाल श्रीमती पाटील सोनाली, श्री बाबा मोरे, श्री कराटे केशव, नारायण वरखेडे, ज्ञानेश्वर कदम, प्रभाकर गावित, सोमनाथ उखर्डे आदीं बरोबर प्रथम वर्ष छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले.