महाराष्ट्र ट्रायबल न्युज

झुंडीपाडा रबर बाॅल लीगचे विजेतेपद पवन वॉरियर्स संघाने पटकावले

प्रतिनिधी | बोरगाव :- सुरगाणा तालुक्यातील झुंडीपाडा (राशा)येथे मान्सून रबर बाॅल लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात १२ संघानी सहभाग घेतला. काठीपाडा येथील पवन वाॅरियस संघाने झुंडीपाडा लीगचे विजेतेपद पटकावत २५ हजार रोख व ट्रॉफी आपल्या नावे केली. झुंडीपाडा येथे आयोजित रबर बाॅल लीग क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील १२ संघांनी सहभाग नोंदवला. पाच दिवस ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान सुरगाणा येथील लॉर्ड्स किंग संघाने मिळवत १५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. स्पर्धेत राशा येथील ठाकरे किंग संघाला ११ हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले. पुष्पराज पानडगळे, जयंतीलाल ठाकरे, रघुनाथ कुवर, तुकाराम वाघमारे, वसंत गावित यांच्या हस्ते पारिताेषिक वितरण करण्यात आले. आयोजक गणेश गावित, राजेश गावित यांनी परिश्रम घेतले.

 विशेष बक्षिस 
 मॅन ऑफ द सिरीज - मधुकर गायकवाड (दोस्ती ११), उत्कृष्ट गोलंदाज - प्रेषित वळवी (पवन वॉरियर्स), बेस्ट फलंदाज - जयेश देशमुख (पवन वारियस), बेस्ट कॅच - मोहन गांगोडा (वीर राईडस).

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने