महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कर्मवीर रावसाहेब थोरात महाविद्यालयात अविष्कार स्पर्धा संपन्न

दिंडोरी l प्रतिनिधी:- मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वणी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत महाविद्यालयात अविष्कार स्पर्धा दि. 12सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून के .टी.एच.एम. महाविद्यालय नाशिक येथील डॉ. आर. डी. घोलप सर व सटाणा महाविद्यालयातील प्रा. व्ही. एम. जगताप सर हे प्रमुख परीक्षक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.घोलप सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबाबतच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्यू नगंडाची भावना, भीती अशा अनेक समस्या असतात प्रत्येकाला संशोधन ही खूप अवघड गोष्ट आहे असे वाटते पण ते तसे नाही या गैरसमजामुळे क्षमता असूनही विद्यार्थी सहभाग घेत नाही विद्यार्थ्यांनी संशोधन करीत असताना सृजनशीलता ,नाविन्यता व संशोधन विषयातील अडचणी समजून घेऊन संशोधनाला सुरुवात करावी संशोधन हे शास्त्रीय पद्धतीने असावे प्राध्यापकांनी संशोधना संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे या संशोधनातून महाविद्यालयातील विद्यार्थी कोणत्याही शाखेमध्ये संशोधन करू शकतो नवनवीन संशोधनातून बेरोजगारीचा प्रश्न हा सुटू शकतो असे विविध मुद्द्यांसह त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे सर यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन करीत असताना वेगवेगळ्या माध्यमांचा कसा वापर करून संशोधन किती सुखकर होईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.वाय.एम.साळुंखे सर यांनी केला.या अविष्कार स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील कला ,वाणिज्य व विज्ञान या सर्व विभागातील 24 प्रोजेक्ट परीक्षणासाठी असून एकूण 48 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाप्रसंगी अविष्कार प्रमुख डॉ. जे.डी.पवार , तसेच अविष्कार समितीतील खांदवे मॅडम, डॉ.बी.टी.ठाकरे मॅडम , प्रा.पी आर.कडलग मॅडम व मोहिते सर व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उमेश देशमुख सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने