महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तालुक्यात ४८.३० टक्के इ-पीक पाहणी

बोरगाव l प्रतिनिधी:-शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी इ-पीक पाहणी ॲपवर पिकाची नोंदणी करण्याची २० सप्टेंबर शेवटची तारीख आहे. तालुक्यात आतापर्यंत ४८.३०टक्के नोंदणी झाली असून अद्याप ५१ टक्के शेतकऱ्यांनी त्वरित पीक पाहणी करावी असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त पीक पाणी सुरगाणा तालुक्यात ४८.३० तर सर्वात कमी नाशिक तालुक्यात ६.५१ टक्के ही पीक पाणी झाली आहे. इ-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांचे पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी ही आकडेवारी उपयोगी येणार आहे. शासनाला एकूण किती जमिनीवर कोणत्या पिकांची पेरणी झाली याची माहिती या इ-पीक पाहणीतून उपलब्ध होणार आहे.
--
मोबाईल हाताळता येत नसल्याने अडचण 

सुरगाणा तालुका अतिदुर्गम असून अनेक शेतकऱ्यांना ॲड्रॉइड मोबाईल हाताळता येत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.
-रामजी राठोड, तहसीलदार, सुरगाणा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने