महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कायदेशीर मदत जागरूकता शिबिर

वैभव पगार l दिंडोरी : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन (डीएड कॉलेज)दिंडोरी येथील महाविद्यालयात सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवसाचे औचित्य साधून कायदेशीर मदत जागरूकता शिबिर, प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय काळोगे होते. तर प्रमुख वक्ते एन.बी.टी.लॉ. कॉलेज, नाशिकचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये आकाश जाधव यांनी भारतीय नागरिकांचे मौलिक अधिकार, चि. दुर्गेश देशमुख यांनी राज्याची मार्गदर्शक तत्वे आणि भारतीय नागरीकांचे कर्तव्य, कु. अदिती बावा यांनी कलम ३२ अन्वये writs, कु.पूजा काचोळे यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९, श्रीमती पूजा गायकवाड यांनी सायबर सिक्युरिटी, श्रीमती ज्योती बोडके यांनी महिलांचे मालमत्ता हक्क, श्रीमती निलम कासव यांनी महिला संरक्षण विषयक कायदा, चि. सोहम देवरे यांनी वहीवाटीचे अधिकार व हक्क, कु. वैष्णवी ढिकले यांनी लग्न, घटस्फोट, खावटी, कु. ॠतुजा दिंडे यांनी लोक आदालत, (लोकन्यायालय) कु.श्रध्दा चकोर मोफत कायदेशीर सेवा, श्री. मार्तंड दाभाडे यांनी शेती विषयक कायदे, दावे, निराकरण, श्री.विशाल भाटिया यांनी मालमत्ता कोर्ट अँक्ट आणि समारोप अशा प्रकारचे कायदेशीर अभ्यासात्मक विश्लेषणात्मक मागदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांनी जीवनात आपल्याला येणाऱ्या अडचणी व कायद्याची गरज व कायद्याची माहितीची आवश्यकता व त्या अनुषंगाने शिबिरातून मिळालेलं मार्गदर्शन आपल्याला मोलाचे ठरणार याविषयी मत मांडले.यावेळी प्राचार्यांनी सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार गुलाबपुष्प देवून केला. सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.डॉ अनिल भोळे, उपप्रमुख प्रा श्रीमती स्मिता ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष छात्राध्यापिका कु. मृणाल फंड हीने .तर प्रास्ताविक श्री.जे.आर. ठोंबरे सर यांनी केले,आभार प्रा. श्री.एम.आर. धामणे सर यांनी केले. फलक लेखन शितल गायकवाड, धनराज धूम, पंकज भोये यांनी केले, तसेच पंकज भोये, दिपक महाले, यांनी फोटो, शूटिंग केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, श्री.पी.एन.बोराडे, क्रिडा शिक्षके श्री.बी. एम.लिलके ग्रंथपाल श्रीमती पाटील सोनाली, श्री बाबा मोरे, श्री कराटे केशव, श्री.नारायण वरखेडे,श्री. ज्ञानेश्वर कदम, श्री प्रभाकर गावित, श्री सोमनाथ उखर्डे आदीं बरोबर प्रथम वर्ष छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने