महाराष्ट्र ट्रायबल न्युज

स्वस्थ नारी सशक्त भारत अभियान - ग्रामीण रुग्णालय वणी येथे विशेष शिबिर

वणी l प्रतिनिधी :- ग्रामीण रुग्णालय वणी यांच्या वतीने “स्वस्थ नारी सशक्त भारत अभियान” अंतर्गत दोन दिवसीय विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २३ सप्टेंबर २०२५ व दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे.
   या शिबिरात महिला व १२ वर्षाखालील मुलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ व अस्थिरोग तज्ज्ञ यांच्या सेवा मिळणार आहेत.
   वाढत्या कर्करोगाच्या प्रमाणाचा विचार करता गर्भाशय मुखाचा, तोंडाचा व स्तनाचा कर्करोग तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच एन.सी.डी तपासणी, आहार मार्गदर्शन, पाळीतील स्वच्छता याबाबत किशोरवयीन मुला-मुलींना समुपदेशन केले जाईल.
   याशिवाय मुलांचे लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात येतील. या दिवशी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय वणीच्या वतीने करण्यात आले आहे.
    नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन स्वतःचे आरोग्य तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने