प्रतिनिधी बोरगाव :- सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्धी अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच लाभार्थ्यांची नोंदणीही करण्यात आली. आणि गावांमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाला स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य, तसेच अधिकारी उपस्थित होते. अभियानाच्या माध्यमातून रोजगार, शेतीपूरक व्यवसाय, महिला बचतगट सक्षमीकरण, आरोग्य व शिक्षण क्षेत्राशी संबंधित योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ग्रामपंचायत मार्फत पुढील काळात अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.