देवडोंगरी l शंकर निंबारे :-
दि.६ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथे आदिवासी समाजाच्या प्रेरणास्थान असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आला. उद्घाटन माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते श्री. हिरामण दादा राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीतल खंडे होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आणि अन्य आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित फोटो प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले.
या उपक्रमात रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धा तीन वयोगटांमध्ये विभागून घेण्यात आली.
इ. १ली ते ४थी गट: प्रथम क्रमांक – अस्मिता रोहिदास लोहारे, द्वितीय क्रमांक – कावेरी विकास पानगे
इ. ५वी ते ७वी गट: प्रथम – तेजल महेंद्र राऊत, द्वितीय – दिपीका प्रभाकर बांगड
इ. ८वी ते १०वी गट: प्रथम – विजया सुरेश राऊत, द्वितीय – राणी अमुता राऊत
चित्रकला स्पर्धात ५वी ते ७वी गटात रूपाली पुंडलिक पानगे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर रोहिणी काशिनाथ दोडके हिला दुसरा क्रमांक मिळाला. ८वी ते १०वी गटात गोकुळ रमेश नावळे प्रथम आणि विशाल पुंडलिक पानगे दुसरा क्रमांकाचे मानकरी ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका श्रीमती शीतल खंडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना शाळेतील शिक्षक श्री. श्रीराज अथिलकर, श्री. दशरथ वडाळ, श्री. प्रदीप शिंदे, श्री. संजय भोये, श्री. सुहास डोंगरे, श्री. दौलत लहारे, श्री. सुभाष अस्वले, श्री. परशुराम महाले, श्री. पवन महाले, श्री. गावित सर, श्रीमती हेमलता मोरे, श्रीमती कमल राऊत यांचे सक्रिय सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन अधीक्षक श्री. प्रभाकर शिंदे व अधीक्षिका श्रीमती विद्या पाहुणे यांच्या देखरेखीखाली पार पडले. बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले.