महाराष्ट्र ट्रायबल न्युज

प्राचार्य चौधरी यांना दर्पण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

ननाशी | विनोद गायकवाड:-येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमाशाळेचे प्राचार्य के.पी.चौधरी यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून दर्पण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांचेवतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.नुकताच नाशिक येथील रोटरी क्लब सभागृह गंजमाळ,शालिमार येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभकर पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात प्राचार्य के.पी.चौधरी यांना पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरम्यान प्राचार्य के.पी.चौधरी यांनी आदिवासी विकास प्रकल्प संचालित शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असतांना अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतांना असंख्या विद्यार्थी घडविले असून अनेक आदीवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.दर्पण राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य चौधरी यांचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने