देवडोंगरी l शंकर निंबारे :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथे शिक्षक दिनानिमित्त एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत एक प्रेरणादायी कार्यक्रम सादर केला. सारिका रोहिदास लहारे या विद्यार्थिनीने "मुख्याध्यापिका" म्हणून पदभार स्वीकारला.
तसेच प्रथमेश लाखन आणि नेहा नावळे यांनी अधीक्षक व अधीक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळली. अजय पानगे (अधीक्षक), हर्षदा कोगिंल (संगणक शिक्षक), तर राणी राऊत आणि विकास खूताडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित भाषणांमधून तेजल लाखन (इ. ६ वी), मोनिका लहारे (इ. ६ वी), मयुर निंबारे (इ. ७ वी), प्रतिक्षा लहारे (इ. ७ वी), शालिनी राऊत (इ. ८ वी) या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत प्रभावीपणे व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीतल खंडे तसेच शिक्षकवृंद – श्री श्रीराज मोहन अथिलकर, श्री दशरथ वडाळ, श्री प्रदीप शिंदे, श्री संजय भोये, श्री सुहास डोंगरे, श्री दौलत लहारे, श्री सुभाष अस्वले, श्री परशुराम महाले, श्री पवन महाले, श्री गावित सर आणि श्रीमती हेमलता मोरे, श्रीमती कमल राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच अधीक्षक श्री प्रभाकर शिंदे, अधीक्षिका श्रीमती विद्या पाहुणे आणि बहुउद्देशीय कर्मचारी यांनीही कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी विकास खूताडे (इयत्ता ८ वी) याने आभार प्रदर्शन केले. मा. अध्यक्षांच्या परवानगीने ‘वंदे मातरम्’ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.