महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दिंडोरी येथे हिंदी दिन उत्साहात साजरा

दिंडोरी l  वैभव पगार - माविप्र समाजाचे जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज दिंडोरी येथे सकाळ व दुपार सत्रात हिंदी दिन व हिंदी पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ होते.
 १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत विद्यालयात हिंदी पंधरवाडा साजरा करण्यात आला असून यानिमित्ताने वक्तृत्व, गीतगायन, निबंध लेखन, चित्रकला, शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. प्राचार्य,उपप्राचार्य,पर्यवेक्षक मान्यवरांना हिंदी विषय समितीच्या वतीने भेटवस्तू देत सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य शरद शेजवळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना हिंदीची उत्पत्ती, इतिहास व राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे महत्त्व स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले भारतीय संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीला राजभाषेचा मान दिला. आपल्या शालेय जीवनात हिंदीचा अभ्यास हा फक्त गुण मिळवण्यासाठी नसून आत्मविकासासाठी असतो. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व नक्कीच आहे, परंतु हिंदीशिवाय आपले भारतीयपण अपूर्ण आहे. 
विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत लेखन, वक्तृत्व, कविता, नाट्यरंग या सर्व क्षेत्रात आपली चमक दाखवली पाहिजे. भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या व्यक्तिमत्वाला नवा आकार देऊ शकतो.
यावेळी उपप्राचार्य उत्तम भरसठ,पर्यवेक्षक यशवंत दाणी ,राजेंद्र शिंदे व जेष्ठ शिक्षक व हिंदी शिक्षक उपस्थित होते.
दुपार सत्रातील प्रास्ताविक श्रीमती कुमावत मॅडम यांनी केले. हिंदी विषय शिक्षक पर्यवेक्षक राजेंद्र शिंदे,जेष्ठ शिक्षक, लक्ष्मण डोंगरे ,प्रमोद
सोनवणे यांनी हिंदीचे महत्व सांगितले.
संगीत शिक्षिका श्रीमती देशपांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीमती विरकर मॅडम व श्रीमती महाले मॅडम यांनीही मनोगत व्यक्त केले. कुमारी श्वेता शिवले व बोरस्ते यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी दोन्ही सत्रात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य,उपप्राचार्य, पर्यवेक्षक ,जेष्ठ शिक्षक व हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सकाळ सत्रात विद्यार्थी मनोगत साहिल नाठे व गौरी वडजे यांनी तर शिक्षक मनोगत श्रीमती आहेर ए. डी. यांनी व्यक्त केले.
इयत्ता 5वी ते 7वी सत्रात कार्यक्रमातील सांस्कृतिक समिती प्रमुख नेहा देशमुख व हिंदी समिती प्रमुख हर्षाली सावंत यांनी नृत्य व नाट्य सादरीकरणास मार्गदर्शन व कार्यक्रमाचे नियोजन केले.
 सूत्रसंचालन एच के सावंत यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती यु.के. धोंडगे यांनी केले.
 विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने