महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ननाशीत ग्लोबंट इंडिया प्रा.लि.कंपनी मार्फत सी.एस.आर.प्रकल्प.

ननाशी | प्रतिनिधी:- येथील ग्लोबल कॉम्प्युटर्स ननाशी या एम.के.सी.एल.मान्यताप्राप्तलर्निंग सेंटर मध्ये ग्लोबंट इंडिया प्रा.लि.याजागतिक दर्जाच्या आय.टी.व सॉफ्टवेअर सेवा कंपनीच्या सी.एस.आर.प्रकल्पा अंतर्गत कौशल्य विकास उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे.
    या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्लोबल कॉम्प्युटर्स मधील सुमारे 24 विदयार्थ्यांना सिक्युरिटी सपोर्ट,नेटवर्क सपोर्ट,हार्डवेअर सपोर्ट आदिचे प्रशिक्षण देण्यात आले.ग्लोबंट इंडिया प्रा.लि.या बहुराष्ट्रीय आय.टी.कंपनीच्या या उपक्रमामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळाली सोबतच रोजगार क्षमतेसाठी आवश्यक आत्मविश्वास आणि व्यवहार ज्ञान आत्मसात करण्यासाठी बहुमोल मदत झाली.दरम्यान या प्रकल्पमुळे ग्लोबल कॉम्प्युटर्स च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपन्यामध्ये नोकरी ची संधी देखील मिळाली आहे.आदिवासी ग्रामीण भागात बहुराष्ट्रीय कंपनीने हा उपक्रम सुरु केल्याने परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
*ग्लोबंट इंडिया प्रा.लि.या बहुराष्ट्रीय आय.टी.कंपनीने आदिवासी ग्रामीण भागातील ग्लोबल कॉम्प्युटर्स मध्ये सी.एस.आर.प्रकल्प आदिवासी ग्रामीण भागातील विदयार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण टप्पा असून या प्रकल्पामुळे आदिवासी ग्रामीण भागतील विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार किंवा नोकरी मिळवण्यासाठी सक्षम होण्यास मदत होणार आहे.-प्रवीण शार्दूल (संचालक ग्लोबल कॉम्युटर्स ननाशी).

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने