महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी तालुका शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; संस्थेला १६ लाखांचा नफा!

दिंडोरी l प्रतिनिधी:-दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन मा. श्रावण भोये यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी पतसंस्थेच्या व सभासदांच्या विकासाच्या ठरावावर अनेक सभासदांनी चर्चेत सहभागी होत ठराव संमत केले.पतसंस्थेला १६ लाखांचा नफा झाल्याबद्दल सभासदांनी आनंद व्यक्त करत संचालक मंडळाचे अभिनंदन केले. चेअरमन श्रावण भोये यांनी सभासदांच्या सर्व शंकांचे समाधानकारक निरसन केले.
   सुरूवातीला पतसंस्थेच्या वतीने अनेक गुणवंत शिक्षकांना एस मराठीचे मुख्य संपादक सुनिल जाधव आणि दिंडोरीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन करून संस्थेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्हा. चेअरमन पंकजकुमार गवळी, मानद सचिव दादाजी आहिरे, विद्यमान संचालक युवराज भरसट, योगेश बच्छाव, गितांजली भोये,उषा दुगाणे,कौशल्या गायकवाड, दिपाली थोरात, प्रविण गरुड, शांताराम आजगे,मधुकर आहेर,सचिन वडजे,सुनिल पेलमहाले,छबिलाल कोळी,एकनाथ पाटील, हरिश्चंद्र गावित, व्यवस्थापक राकेश थेटे,शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह रावसाहेब जाधव,तालुका अध्यक्ष सुभाष बर्डे, शिक्षक संघाचे नेते धनंजय वानले,जुनी पेंशन चे तालुका अध्यक्ष दुर्वादास गायकवाड, विस्तार अधिकारी गुलाब गुंबाडे आदी उपस्थित होते.
   सभेचे सूत्रसंचालन रावसाहेब जाधव व पंकजकुमार गवळी यांनी केले तर धनंजय वानले यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने